Dadasaheb Tare Charitable Trust, Achalpur

संस्थेची माहिती :संस्थेचे नावं-   “श्री दादासाहेब तारे चॅरिटेबल ट्रस्ट”,अचलपुर शहर,ता.अचलपुर,जि.अमरावती

संस्थेचे उद्देश्य :१) समाजाच्या नैतिक,सामाजिक,शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे मदत करणे.
२) ग्रामीण व शहरी भागातील युवक/युवतींना एकत्रित करून त्यांच्यात एकात्मतेची भावना जागृत करणे.
३) थोर पुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणे.लोकांना एकत्रित करून त्यांच्यात सदाचाराची भावना जागृत करणे.
४) ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याकरिता शैक्षणिक संस्था स्थपना करून चालविणे.जसे बालक मंदिर, प्राथमिक शाळा, माध्यामिक शाळा, अंगणवाडी, नर्सरी स्कुल, कॉन्व्हेंट स्कुल, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, तांत्रिक महाविद्यालये, वैदकीय महाविद्यालये, कृषि विद्यालय व महाविद्यालय स्थापना करून चालवणे.
५) ग्रामीण व शहरी भागातील लोकांना साक्षर करण्याकरिता प्रौढ प्रशिक्षणाचे वर्ग उघडून चालविणे.
६) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
७) शासनाच्या खेळाच्या स्पर्धा आयोजित करणे जसे क्रिकेट, व्होलीबॉल, बॅट-मिंटन, ज्युडो-कराटे, कुस्ती,कॅरम प्रशिक्षण देणे व स्पर्धा आयोजित करणे.
८) सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करणे.वृद्धाश्रम चालविणे.अपंगाचे शिक्षणासाठी अंध,मुक,बधिर विद्यालये व वसतीगृह सुरु करून चालविणे.
९) ग्रामीण व शहरी भागातील युवक/युवतींना रक्तदानाच्या हेतुकरिता प्रोत्साहीत करणे, प्रथमोपचार केंद्र, दवाखाने, प्रसुतिकागृह स्थापन करणे व चालविणे,व तसेच व्यसनमुक्ती उपचार केंद्र चालविणे.
१०) व्यायाम शाळा स्थापन करणे व चालविणे,प्रदर्शने,व्याख्याने,परिसंवाद,चर्चासत्रे स्पर्धा आयोजित करणे.
११) ग्रामीण रुग्णालये, रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, व्यावसायिक, वैद्यकीय, गृहउद्योग, शिवणक्लास यांचे प्रशिक्षण उघडून चालविणे. दवाखाना, वृद्धाश्रम व अनाथाश्रम, अंगणवाडी, वाचनालय उघडणे.
१२) शासकिय व निमशासकिय समाज उपयोगी योजना राबविणे.
१३) पाणलोट क्षेत्र विकासाच्या दृष्टीने सामजिक योजना राबविणे.
१४) केंद्र शासन व राज्य शासन यांच्या पुरस्कृत योजना राबविणे.

अध्यक्ष

मा. श्री.श्रीपाद कृष्णराव तारे

उपाध्यक्ष

सौ.कमल कृष्णराव तारे

सचिव

सौ.श्रुती श्रीपाद तारे